चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पंतग उडविताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:45 PM2021-01-13T12:45:59+5:302021-01-13T12:47:06+5:30

अहमदनगर : नागपूर येथे चायना मांज्यामुळे गळा चिरून तरुणाचा अंत झाला. या पार्श्वभूमीवर नगर शहरातही पोलीस, वन विभाग आणि महापालिका यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे. चायना मांजा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे, मात्र पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा  दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी वनविभाग, पोलीस आणि महापालिकेची पथके तैनात करण्यात आली असून त्यांची शहरात दोन दिवस गस्त राहणार आहे.

Save the lives of city dwellers from Chinese cats, action will be taken even if China cats are seen flying kites | चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पंतग उडविताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पंतग उडविताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

googlenewsNext

अहमदनगर : नागपूर येथे चायना मांज्यामुळे गळा चिरून तरुणाचा अंत झाला. या पार्श्वभूमीवर नगर शहरातही पोलीस, वन विभाग आणि महापालिका यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे. चायना मांजा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे, मात्र पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा  दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी वनविभाग, पोलीस आणि महापालिकेची पथके तैनात करण्यात आली असून त्यांची शहरात दोन दिवस गस्त राहणार आहे.

नगर शहरात मोठ्या प्रमाणावर चायना मांज्याची विक्री जोरात सुरू आहे. गेल्या आठ दिवसात तीन पक्षी मांजामुळे जखमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये चिचुंद्री,घुबड या पक्षांचा सममावेश आहे. याशिवाय अनेक दुचाकांमध्येही मांजा अडकल्याचे प्रकार घडत आहेत.

वन विभागाने मंगळवारी पाच दुकानांवर कारवाई केली. त्यामध्ये १४१ मांजा चक्री जप्त केल्याचे आढळून आले आहे. मात्र वनविभागाकडे कर्मचारीबळ नसल्याने सलग दोन दिवस त्यांच्याकडून कारवाई होईल की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनावरच आता कारवाईची भिस्त राहणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने मांजा विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली असून महापालिा प्रशासनही कारवाई करणार आहे.

-------------

अशी होईल कारवाई

पतंग विक्रेत्यांकडे चिनी मांजा आढळून आल्यास गुन्हा 

पतंग उडविताना चिनी मांजा आढळून आल्यासही गुन्हा

एकत्र पद्धतीने पतंग उडविणाऱ्यावरही कारवाई

साहित्य जप्त केले जाणार

--------------

पालकांनीही घ्यावी दक्षता

पतंग उडविण्यासाठी साधा दोरा द्यावा

चायना मांजा असल्यास काढून घ्यावा

दोऱ्याची लांबी कमी द्यावी

घराच्या छतावरच गर्दी करू देऊ नये

मोकळ्या मैदानात पतंग उडवावा

----------------------

दोन दिवस सतर्कता

बुधवार आणि गुरुवारी दोन्ही दिवस प्रशासनाने दक्षता घेतली असून चिनी मांजा वि क्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचे पक्षीमित्र, पर्यावरण मित्रांनीही स्वागत केले आहे.

Web Title: Save the lives of city dwellers from Chinese cats, action will be taken even if China cats are seen flying kites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.