कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी संगमनेरकर एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 11:52 AM2021-10-04T11:52:34+5:302021-10-04T11:53:10+5:30

संगमनेर: गोवंश जनावरांची हत्या होत असल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे.

Sangamnerkar rallied to demand closure of the slaughterhouse | कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी संगमनेरकर एकवटले

कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी संगमनेरकर एकवटले

Next

संगमनेर : शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रस्ता, भारतनगर, कोल्हेवाडी रस्ता या परिसरात दररोज गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते. संगमनेरातील गोमांस मुंबई, ठाणे तसेच परराज्यातसुद्धा पाठविण्यात येते. परंतू याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करत सोमवारी (दि.०४) येथील प्रांत कचेरीसमोर आंदोलन सुरू केले आहे.

 

गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेले कत्तलखाने कायम स्वरूपी बंद करावेत. अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
  गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील वाड्यांमध्ये शनिवारी (दि. ०२) पाेलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल १ कोटी ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता. यात ३१ हजार किलो गोमांस जप्त करत ७१ गोवंश जनावरांना जीवदान मिळाले होते.

Web Title: Sangamnerkar rallied to demand closure of the slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.