शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 5:18 PM

भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला.

शिर्डी : भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला.क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर यांनी सोमवारी पत्नी डॉ़अंजली, मुलगा अर्जुन व भाऊ अजित यांच्यासह साई दरबारी हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी सचिन यांच्या नावाचा जयघोष केला. मंदिरात मात्र भाविकांनी साईनामाचा जयघोष केला. सचिन यांच्या हस्ते समाधीवर शाल अर्पण करण्यात आली. समाधीवरील सुवर्ण पादुकांवर अभिषेक करण्यात आला. अंजली यांनी साईमूर्ती समोरील दानपेटीत दक्षिणा अर्पण केली.दर्शनानंतर सचिन यांनी आज बाबांच्या दर्शनाने खुप समाधान मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे व्यक्त केली. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने मुगळीकर तसेच शिर्डीकरांच्या वतीने नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी तेंडुलकर कुटूंबाचा सत्कार केला. यावेळी जयश्री मुगळीकर, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, सुनील गोंदकर, सुजीत गोंदकर, मंदिर पर्यवेक्षक शिवाजीराव गोंदकर यांची उपस्थिती होती. चार्टर विमानाने सचिन साईबाबा विमानतळावर उतरले. तेथून ते कारने मंदिर परिसराच्या बाहेर येताच चाहत्यांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला. सुरक्षा रक्षकांनी कडे करून संपूर्ण तेंडूलकर परिवाराला मंदिर परिसरात आणले. यावेळी मंदिर परिसरातही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिरात तर सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिकांनी व भाविकांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी