शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

दोन तासातच झाला लुटमारीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:19 PM

स्वता:त सोने देऊन पुण्यातील एका व्यापा-याची पावणे चार लाखांची फसवणूक करणा-या एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी दोन तासातच रंगेहाथ पकडले.

भिंगार : स्वता:त सोने देऊन पुण्यातील एका व्यापा-याची पावणे चार लाखांची फसवणूक करणा-या एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी दोन तासातच रंगेहाथ पकडले. लुटमारीची ही घटना नगर तालुक्यातील साकत येथे शुक्रवारी पहाटे घडली होती.याबाबत पुणे येथील व्यापारी संभाजी शिवाजी इंदळकर (वय ४४, रा. भारती विद्यापीठ परिसर, पुणे) यांनी शुक्रवारी नगर तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. यादृष्टीने पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता. संभाजी इंदळकर यांना अनोळखी नंबरवरुन फोनद्वारे तीन लाखात अर्धा किलो सोने देतो, अशी बतावणी करुन नगर येथील सोलापूर रोडवरील साकत गावाजवळ एका निर्जनस्थळी शेतात बोलावून घेतले. यावेळी इंदळकर हे शुक्रवारी पहाटे येथे आले. यावेळी ८ अनोळखी इसमांनी त्यांच्याकडून तीन लाख रुपये रोख रक्कम, मनगटी घड्याळ, मोबाईल फोन, गॉगल तसेच वॉलेट व ओळखपत्रे असे असा एकूण तीन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता, असे इंदळकर यांनी फिर्यादीत म्हटले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना आरोपींचे वर्णन सांगितले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान,  अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान गांगर्डे, विनोद पवार, संदीप जाधव, संदीप पवार हे वाळकी गावात आरोपींचा शोध घेत होते. यावेळी असताना वाळकी येथे एक संशयीत इसम फिरताना आढळला. त्यास हटकले असता तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यास पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्याची चौकशी कसून चौकशी केली असता त्याने  समाधन गजानन काळे (वय २७, रा.दहिगाव, ता. जि. अहमदनगर) असे नाव सांगितले.आरोपीकडे आढळले फिर्यादीचे पॅनकार्ड आरोपीची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचे मनगटी घड्याळ, इंदळकर यांचे पॅनकार्ड, मतदान कार्ड, ए.टी. एम.कार्ड, एक हजार किमतीचा व ५ हजार रुपये किमतीचा असे दोन मोबाईल असा एकूण ४६ हजार रुपये किंमतीचा ऐवज आढळून आला.  यावरुन पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून इतर ७ साथीदारांचे नावे निष्पन्न झाले आहेत.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे व सहकारी करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी