शेंडी बँकेत दाखल झालेले दरोडेखोर अखेर पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:14+5:302021-09-02T04:46:14+5:30
या प्रकारामुळे शेंडी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र संपूर्ण प्रसंगानंतर खुलासा झाला की एमआयडीसी ...

शेंडी बँकेत दाखल झालेले दरोडेखोर अखेर पोलिसांना शरण
या प्रकारामुळे शेंडी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र संपूर्ण प्रसंगानंतर खुलासा झाला की एमआयडीसी पोलिसांनी मॉकड्रील करून आपत्कालीन परिस्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणा कशी कार्यान्वित करायची याचे सादरीकरण केल्याचे आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
ग्रामीण भागात वस्त्यांवर चोऱ्या, दरोड्याचे प्रकार झाल्यावर आधुनिक तंत्रज्ञानातून सुरक्षा यंत्रणा कशी सक्रिय करायची यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असे मॉकड्रील विविध गावात आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होत आहे. या मॉकड्रील बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रय गोर्डे यांनी माहिती दिली. या मॉकड्रीलसाठी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.