रस्तालूट करणारी टोळी जेरबंद; चाकूच्या धाकाने अनेकांना  लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:37 PM2020-02-23T16:37:34+5:302020-02-23T16:38:18+5:30

प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणा-या चौघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पुणे रोडवर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़. 

Road racket The knife knife robbed many | रस्तालूट करणारी टोळी जेरबंद; चाकूच्या धाकाने अनेकांना  लुटले 

रस्तालूट करणारी टोळी जेरबंद; चाकूच्या धाकाने अनेकांना  लुटले 

Next

अहमदनगर : प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणा-या चौघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पुणे रोडवर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़. 
 कय्युम काझी कुरेशी (वय २३ रा़ बाबा बंगाली, अहमदनगर), सद्दाम मोहम्मद अली (वय २३रा़ झेंडीगेट), मोईन बादशाह शेख (वय २० रा़ बुरुडगाव) व मुसेफ नासीर शेख (वय २० रा़ मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शुक्रवारी (दि़२१) माळीवाडा बसस्थानक येथून विशाल विजय कोबरणे (गणेगाव ता़ राहुरी) याला राहुरी फॅक्टरी येथे सोडतो असे सांगून त्याला जबरदस्तीने मिरावली पहाड परिसरात घेऊन गेले़. तेथे चाकूचा धाक दाखवून आरोपींनी विशाल याचा मोबाईल व कागदपत्र हिसकावून घेत त्याला सोडून दिले़. याबाबत विशाल कोबरणे याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ही लूटमार करणारे आरोपी नगर-पुणे रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना कारसह ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चौघांनी विविध ठिकाणी लूटमार केल्याचे समोर आले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन कार, मोबाईल असा ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक शिरसाठ हे करत आहेत. 
वीस दिवसांत १० जणांची लूटमार 
नगर शहर व परिसरात महिलांचे दागिने ओरबाडणे आणि शस्त्रांचा धाक दाखवून प्रवशांची लूटमार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या २० दिवसांत नगर शहरात धूमस्टाईलने तीन महिलांचे दागिने ओरबाडले तर एका महिलेचे दोन लाख हिसकावून नेले आहेत. नगर तालुका, एमआयडीसी आणि शहर पोलीस ठाणे हद्दीत सहा जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. यात चार जण वाहनचालक आहेत. 
लूटमार करणा-या टोळ्या नगरच्याच 
नगर शहरात प्रवाशांची लूटमार करणा-या टोळ्या या नगर व परिसरातीलच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे लुटारु पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होऊ शकतात.  

Web Title: Road racket The knife knife robbed many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.