शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करा; माध्यमिक शिक्षक संघाची निदर्शने

By चंद्रकांत शेळके | Published: October 24, 2023 06:26 PM2023-10-24T18:26:22+5:302023-10-24T18:26:35+5:30

शासनाने कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केलेली आहे. मात्र दत्तक शाळा योजना रद्द करण्याबाबत शासनाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Revoke the decision on the school adoption scheme; Demonstrations of Madhyamik Teachers Union | शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करा; माध्यमिक शिक्षक संघाची निदर्शने

शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करा; माध्यमिक शिक्षक संघाची निदर्शने

अहमदनगर : शाळा दत्तक योजना व कंपनीकरण निर्णय रद्द होण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. गोरगरिबांच्या शिक्षणाच्या वाटा बंद करणारा जाचक शासन निर्णय रद्द होण्यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, संभाजी पवार, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, बद्रीनाथ शिंदे, प्रशांत साठे, गणेश जाधव, रंगनाथ जाधव, बी. एस. काकडे, अविनाश घोरपडे, सहादू कटारे, शिवाजी नरसाळे, हरिश गाडे, प्रशांत गावडे, अशोक झिने, ज्ञानदेव बेरड आदींसह शिक्षक, शिक्षकेतर सहभागी झाले होते.

शासनाने कंत्राटीकरणाचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केलेली आहे. मात्र दत्तक शाळा योजना रद्द करण्याबाबत शासनाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. १८ सप्टेंबर रोजीच्या दत्तक शाळा योजनेच्या आदेशामुळे संपूर्ण राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यामुळे गोरगरिबांच्या शिक्षणाच्या वाटा बिकट होऊन ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशाप्रकारे शिक्षण व्यवस्था उध्वस्त झाल्यास खासगी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा सुद्धा धोक्यात येणार असल्याची भिती संघटनेच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Revoke the decision on the school adoption scheme; Demonstrations of Madhyamik Teachers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.