शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:08 AM

गत विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले. त्यांनाच सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून बाजारात आणत आहेत

ठळक मुद्देनिलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा अरणगावात समारोप खासदार सुप्रिया सुळे यांची बंडखोरांवर टीकासाकळाईबाबत सरकारचे घूमजाव सूडाचे राजकारण सहन करणार नाहीमैं तो फकीर हॅूँ.. : लंके

केडगाव :  गत विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले. त्यांनाच सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून बाजारात आणत आहेत. पण हा नाकारलेला माल जनता कसा स्विकारेल? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही काँग्रेसच्या बंडखोरांवर टीका केली आहे.राष्टÑवादीचे नेते निलेश लंके यांच्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनशाम शेलार, अशोक सावंत, अभिषेक कळमकर, किसन लोटके, बबन डोंगरे, गोरख दळवी, अशोक झरेकर आदी उपस्थित होते. सभेला मोठी गर्दी होती. सुळे म्हणाल्या, नगरचे राजकारण फारच गमतीशीर आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. निलेश लंके यांनी स्वार्थासाठी नव्हे, तर काही तरी बदल व्हावा म्हणून पक्ष बदलला. त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणा-यांनी हे लक्षात घ्यावे जर चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही तर आम्हीच तुमच्या संपत्तीची चौकशी लावू.

साकळाईबाबत सरकारचे घूमजाव  मुख्यमंत्री वाळकीत येऊन साकळाई योजनेचा शब्द देतात आणि त्यांचे मंत्री योजना होणार नसल्याचे सांगतात. मग खोटे नक्की कोण बोलते ? हे कळत नाही असे म्हणत साकळाई योजनेबाबत सरकार घूमजाव करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. 

सूडाचे राजकारण सहन करणार नाहीसत्ताधा-यांच्या विरोधात बोलला म्हणून त्रास देणार असाल आणि सूडाचे घाणेरडे राजकारण करणार असाल तर महाराष्टÑ कधीही सहन करणार नाही. विरोधक आमच्यासारखे दिलदार हवेत. शेतकरी कर्जमाफीसाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

मैं तो फकीर हॅूँ.. : लंकेनिलेश लंके म्हणाले, अनेकांना देवदर्शन घडवले म्हणून माझ्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होत आहे. पण ‘मेरी तो साईबाबा की झोली हैं. कभी भी भरती हंै, कभी भी खाली होती हैं. मैं तो फकीर हूॅँ.’ माझे बँकेत खातेच नाही. माझी कसली चौकशी करणार?  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस