शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

परदेशी कुकला चोर समजून चोपले; पोलिसांनी गुन्हाही केला दाखल, सोशल मीडियावर युवकाने मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 4:49 PM

वाघापूर शिवारात शेतक-यांनी एका परप्रांतीय युवकाला शेतातील फ्लावर चोरल्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, हा युवक संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता त्यास पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सायंकाळपर्यंत ठाण्यात बसून ठेवले. दरम्यान, या युवकाने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकून आपली व्यथा मांडली.

 घारगाव : संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतक-यांनी एका परदेशी युवकाला शेतातील फ्लावर चोरल्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, हा युवक संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता त्यास पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सायंकाळपर्यंत ठाण्यात बसून ठेवले. दरम्यान, या युवकाने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकून आपली व्यथा मांडली.

संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशाल कुमार केशी (रा.नेपाळ) असे या युवकाचे नाव आहे. तो घारगाव येथील हॉटेलात कुकचे काम करतो. पोलिसांनी सहकार्य न केल्याने त्याने आपला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने म्हटले आहे की, गणेश विसर्जनाच्या दिवशी मी संगमनेरला गेलो होतो. तेथे मित्रांसोबत पार्टी केली. येताना मित्रांनी मला वाघापूर शिवारात सोडून दिले. मी दारूच्या नशेत असल्याने भरकटलो. मी चोरी केली नाही. परंतु मला चोर समजून येथील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी त्याची मागणी आहे. 

संगमनेर येथील वाघापूर शिवारातील देवगाव रोडलगत दिलीप नारायण शिंदे, सोमनाथ शिंदे यांची शेती आहे. शिंदे यांच्या शेतीतून २९ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या काळात आरोपी विशाल केशी याने फ्लॉवर चोरून नेले. २ सप्टेंबरला चोरी करीत असताना विशाल केशी हा शिंदे यांच्या ताब्यात सापडला. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दिलीप शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल कुमार केशी याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी हा घारगाव परिसरात एका हॉटेलमध्ये कूक आहे. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे, असे  पोलीस नाईक विजय पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी