शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:27 PM

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला.तो महात्मा गांधी रोड, दिवा बेलापूर रोड, नवी मुंबई येथील रहिवासी आहे. ठाणे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची चांगली वर्तणूकपाहून त्याला २०१३ मध्ये विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते. त्याने येरवडा व विसापूर कारागृहात यापूर्वी कधीही सुट्टी घेतलेली नाही.सोमवारी सकाळी चहा पिण्याच्या बहाण्याने बराकीतून तो बाहेर पडला होता. त्यानंतर कारागृहाच्या पूर्वेकडील संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो फरार झाला. कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासूद, राजेंद्र पवार व कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. परंतु तो सापडला नाही. कारागृह प्रशासनाच्या वतीने बेलवंडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाjailतुरुंग