शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची झडप; एकास पकडले, पाच जणांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 6:24 PM

साकत फाट्यावर  दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

जामखेड : तालुक्यातील साकत फाट्यावर  दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.       जामखेड पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि सर्व पोलीस फौजफाट्यासह गस्त घालत आसताना साकत फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी झुडुपाच्या आड अंधारात लपून बसलेली होती. गस्तीवर असणाºया पोलीस पथकाने झडप घालून आरोपी मोतीराम मुरलीधर टेकाळे यास गावठी रिव्हॉल्व्हर, तलवार, मिरची पूड, कटावणी आदी हत्यारांसह ताब्यात घेतले. तर इतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.        अटक केलेला आरोपी मोतीराम टेकाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींनी फरार झालेल्या आपल्या साथीदारांचे नावे पोलिसांंना दिले आहेत. त्यामध्ये  ऋषिकेश गोवर्धन सानप, अजय भरत सानप, विशाल भाऊसाहेब कुमटकर, सचिन कांबळे, राम सांगळे (सर्व रा. सौताडा, ता. पाटोदा) या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारी