शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती

By मिलिंदकुमार साळवे | Published: January 22, 2019 1:09 PM

अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.बाजार समितीच्या आर्थिक व्यवहार व भविष्य निर्वाह निधीबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ (फिरते पथक) एस. डी. कुलकर्णी यांना बाजार समितीने कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबतच्या मुद्याची फेरचौकशी करण्यासाठी प्राधिकृत केले होते. कुलकर्णी यांनी याबाबत चौकशी करून आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर केला आहे.समिती कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बचत खाते उघडून त्या खात्यात भरणा करीत आहे. पण ही कपात केलेली रक्कम वेळच्या वेळी भरणा केलेली नाही. सन २००९-१० पासूनची कपात केलेली रक्कम भरणा करणे बाकी आहे. तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम सन २००३-२००४ पासून तरतूद करून ती देणे दर्शविलेली आहे. ती देखील भरणा करणे बाकी आहे.अहवालातील निष्कर्षअहमदनगर बाजार समितीने कर्मचाºयांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम भरणा करणे बाकी आहे. समितीने तिच्या आर्थिक अडचणीमुळे रक्कम थकीत असल्याचे मान्य केलेले आहे. भविष्य निर्वाह निधीच्या व्यवहारात अपहार, अफरातफर,गैरविनियोग झाल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष विशेष अहवालात नोंदविण्यात आला आहे. तसेच थकीत असलेली रक्कम भरणा करण्याबाबत बाजार समितीस निर्देश देणे आवश्यक राहील,अशी शिफारसही कुलकर्णी यांनी केली आहे.दादा पाटील शेळकेंचा प्रतिसाद नाहीमाजी खासदार दादा पाटील शेळके व इतरांनी याबाबत तक्रार केली होती. तसेच ३ आॅक्टोबर २०१८ रोजी ठिय्या आंदोलन केले होते. तक्रारीबाबत म्हणणे मांडण्यासाठी चौकशी अधिका-यांनी शेळकेंना पत्र पाठविले होते. पण त्यांनी चौकशीस प्रतिसाद दिला नाही.३१ मार्च २०१८ अखेर कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम१ कोटी २० लाख ४६ हजार १७९ रूपयेतसेच बाजार समितीचा भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा२ कोटी ३० लाख ५८ हजार ११४ रूपयेभरणा करणे बाकी असल्याचे अहवालातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर