साईदर्शनासाठी भाविकांना ठरावीक दिवशीच होणार पास वितरण; गर्दी टाळण्यासाठी संस्थानचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:50 AM2021-01-12T11:50:53+5:302021-01-12T11:52:10+5:30

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिवार, रविवार तथा सुट्या व सणांच्या दिवशी या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला असल्याचे संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे.

Pass distribution to devotees for side visit will be on a certain day; Sansthan's decision to avoid crowds | साईदर्शनासाठी भाविकांना ठरावीक दिवशीच होणार पास वितरण; गर्दी टाळण्यासाठी संस्थानचा निर्णय 

साईदर्शनासाठी भाविकांना ठरावीक दिवशीच होणार पास वितरण; गर्दी टाळण्यासाठी संस्थानचा निर्णय 

Next

शिर्डी : शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढूनच यावे. साईसंस्थानचे पास वितरण केंद्र गुरुवार, शनिवार, रविवार तथा सुट्या व सणांच्या दिवशी या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला असल्याचे संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे.

     साईसंस्थानचे सीईओ बगाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, साई मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरुपाची असल्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात पंधरा हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. भाविकांना यापूर्वी सशुल्क व विनाशुल्क पास अगोदर काढून नियोजनपूर्वक दर्शनास यावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे.

    विशेषतः गुरुवार, शनिवार, रविवार आणि इतर सण अथवा सुट्यांच्या दिवशी अधिक गर्दी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर ताण येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीपासून शासनाचे निर्बंध शिथिल होईपर्यंत साईसंस्थानचे पास वितरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाण वाढत आहे. पालखी मंडळांनी शिर्डीत पालख्या आणण्याचे शंभर टक्के टाळावे, संस्थान प्रशासनाने या आवाहनाचे तंतोतत पालन करावे, असे आवाहन बगाटे यांनी केले आहे.

Web Title: Pass distribution to devotees for side visit will be on a certain day; Sansthan's decision to avoid crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.