प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 10:40 AM2020-10-25T10:40:18+5:302020-10-25T10:41:00+5:30

सलग दुस-या वर्षी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे  ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऊस, कांदा,गहू लागवडीमध्ये वाढ होणार आहे.

Pachegaon, Punatgaon dams on Pravara river | प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव बंधारे तुडुंब

प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव बंधारे तुडुंब

googlenewsNext

पाचेगाव :  सलग दुस-या वर्षी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे  ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऊस, कांदा,गहू लागवडीमध्ये वाढ होणार आहे.

         गेल्या जून महिन्यापासून धरणांच्या घाटमाथ्यावर दमदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे भंडारदरा,  मुळा,  निळवंडे ही धरणे यंदा आॅगस्ट महिन्यामध्येच ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे वरील तीनही धरणातून जायकवाडीच्या दिशेने ४० टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. घाटमाथ्यावर अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे प्रवरा नदी अजूनही वाहती आहे.

  दोन्ही बंधा-यामध्ये सात सात झडपा टाकून पाणी अडविण्यात आले असून हे बंधारे सलग दुस-या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे परिसरातील भूगर्भामधील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

Web Title: Pachegaon, Punatgaon dams on Pravara river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.