आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद; शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:04 PM2020-08-01T17:04:08+5:302020-08-01T18:31:30+5:30

ज्या नव-यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे  नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.

Our leaders have the power to handle two or four wives; Sadashiv Lokhande responds to former minister Ram Shinde's criticism | आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद; शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर

आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद; शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर

googlenewsNext

अहमदनगर : ज्या नव-यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे  नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.

नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे शनिवारी (१ आॅगस्ट) दूध आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सरकारवर टीका केली. टीका करताना राम शिंदे म्हणाले, एका नव-याच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकार आहे. त्यांना शेतक-यांचे काहीही घेणेदेणे नाही. त्यांचे सर्व आटोपले असून कारभारी घरात बसून प्रपंच कसा चालणार? हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले असून ते कधी कोसळेल हे सांगता येत नाही.

दरम्यान खासदार लोखंडे हे शनिवारी दुपारी एका बैठकीच्या निमित्ताने नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी काही निवडक पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली. 

खासदार लोखंडे म्हणाले, दूध उत्पादक व्याकुळ झाले आहेत, ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले पाहिजे.

Web Title: Our leaders have the power to handle two or four wives; Sadashiv Lokhande responds to former minister Ram Shinde's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.