शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सात शिक्षकांवर गुन्हा दाखलचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:27 PM

निवडणुकीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सोपवलेले काम घेण्यास नकार देणा-या सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत.

ठळक मुद्देबीएलओचे काम नाकारले :   आदेश येताच शिक्षकांची धावपळ

अहमदनगर : निवडणुकीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना (बीएलओ) सोपवलेले काम घेण्यास नकार देणाºया सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अद्ययावत मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने जिल्ह्यातील काही शिक्षक, तसेच इतर विभागांतील सरकारी अधिका-यांना बीएलओ म्हणून नेमले आहे. सुरूवातीला बीएलओचे कामकाज करण्यास काही शिक्षकांनी टाळाटाळ केली. परंतु निवडणूक शाखेने कडक पावले उचलल्याने हे शिक्षक पुन्हा कामावर रुजू झाले. तरीही नगर तालुक्यातील काही शिक्षकांनी बीएलओ कामास नकार दिला. शेख रमजान खुदबुद्दीन (जि.प. शाळा सारोळा कासार), मेघा रासकर (सारोळा कासार), संजय शेळके (खंडाळा), सुप्रिया देशमुख (कर्जुनेखारे), रेणुका खेडकर (विळद), जे. डी. करांडे (चिचोंडी पाटील) व जालिंदर बोरुडे (भातोडी पारगाव) या सात शिक्षकांनी हे काम घेण्यास नकार दिल्याने या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले. या शिक्षकांना बीएलओ कामाचा आदेश बजवावा, या कामात त्यांनी हयगय केल्यास त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०चे कलम ३२ नुसार नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे या आदेशात म्हटले आहे. 

शिक्षक संघटना हादरल्याहा आदेश येताच यातील काही शिक्षकांनी त्वरित बीएलओचे काम स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालय गाठले. बाकींवर शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. मंगळवारी दिवसभर या कारवाईबाबत शिक्षक संघटनांमध्ये महसूल विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. व्हॉट्सअ‍ॅपवरून अनेक शिक्षक नेत्यांनी महसूलला योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. फक्त शिक्षकांनी एकी ठेवावी, असे चिथावणीखोर मेसेज पाठवले जात होते. एकूणच या कारवाईमुळे शिक्षकांसह शिक्षक नेतेही हादरले आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय