भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:33 AM2020-11-15T11:33:56+5:302020-11-15T11:34:52+5:30

भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पोने रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये टेम्पोतील दोघांचा समावेश आहे. 

One killed sleeping on the sidewalk in a collision with a speeding vehicle; Four injured | भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी

भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी

Next

अहमदनगर : भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पोने रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये टेम्पोतील दोघांचा समावेश आहे. ही घटना अहमदनगर शहरातील नगर-सोलापूर महामार्गावर चांदणी चौकानजीक शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात मेहताब शेख (वय २१, रा. उत्तरप्रदेश) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुसाईद शेख (वय २५), जावेद शेख (वय २०) हे दोघे जखमी झाले आहेत. सोलापूरहून नगरच्या दिशेने येत असलेला एक मालवाहू आयशर टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिस जवळ सुटले. याठिकाणी फुटपाथवर परप्रांतीय बूट विक्रेते रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत होते. यावेळी त्यांना टेम्पोने धडक दिली. यात मेहताब शेख याचा मृत्यू झाला, तर झोपलेले इतर दोघे व टेम्पोतून प्रवास करणारे दोघे असे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांची नावे समजली नाहीत.

Web Title: One killed sleeping on the sidewalk in a collision with a speeding vehicle; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.