शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहन चालकास भरदिवसा दीड लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:45 PM

नगर-औरंगाबाद महामार्गावर खडका शिवारात सोमवारी सकाळी भरदिवसा वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून  १ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी वाहन मालक राजकुमार दिलीप चव्हाण (रा.जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर खडका शिवारात सोमवारी सकाळी भरदिवसा वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून  १ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी वाहन मालक राजकुमार दिलीप चव्हाण (रा.जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर येथे दोरीचा माल खाली करून राजकुमार चव्हाण व क्लिनर किशन सुरवशे हे दोघे गाडी क्रमांक (एम.एच.२१-बी एच.०९०६) घेऊन दि. ४ मे रोजी जिंतूरकडे निघाले दरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली चव्हाण व सुरवशे जेवणासाठ थांबले. जेवण करून गाडीकडे जात असताना तेथे दुचाकीवर आलेल्या एकाने दोघांना शिव्या दिल्या. हातात दगड उचलून चाकूचा धाक दाखवून चव्हाण यांच्या हातातून गाडीची चावी घेतली. याननंतर चव्हाण यांच पॉकेट मोबाईल व पँटच्या खिशातील १६ हजार रुपये बळजबरीने घेतले. त्यानंतर गाडीची डिक्की खोलून त्यामधील १ लाख ३६ हजार ६०० रुपये काढले. टेम्पो लॉक करून घेतला. घेतलेला मोबाइल फोन व पाकीट तिथे टाकून तो मोटारसायकल वरून अहमदनगरच्या दिशेने निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान तपासासाठी नेवासा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारी