शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

एकाने नव्हे,लोकांनी भगवानगड मोठा केला : महंत नामदेव शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:00 PM

गेल्या १५ वर्षांमध्ये कोणा एकाने नव्हे, तर लोकांनी भगवानगड मोठा केला. कोणी वीस लाख तर कोणी ४० लाख गडाला दिले.

बोधेगाव : गेल्या १५ वर्षांमध्ये कोणा एकाने नव्हे, तर लोकांनी भगवानगड मोठा केला. कोणी वीस लाख तर कोणी ४० लाख गडाला दिले. आज गडावरील हिरवळ पाहून काही लोक जळत आहेत. पण मन शुद्ध असणे गरजेचे आहे, असे म्हणत भगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांनी बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या कार्यक्रमातून विरोधकांवर नामोल्लेख टाळून हल्लाबोल केला.नुसती भाषणे करून गड आपला होत नसतो. त्यासाठी झिजावे लागते. बाबांच्या गादीत मोठी ताकद आहे. ही गादी एखाद्याला घडवू शकते अन् एखाद्याला बिघडवूही शकते,असे म्हणत त्यांनी गड राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे त्यांना जे विरोध करीत आहेत, त्यांचा नामोल्लेख टाळत टोला लगावला.भगवानगडाची ताकद मला समजली, म्हणून गड शाबूत आहे. वय झाल्यावर थकल्यासारखे होते. पण कारखाना जायची वेळ आली, तेव्हा प्रताप ढाकणेंना जाग आली आणि भगवानगड जायला लागला, तेव्हा मला जाग आली. चुका होत असतात, पण त्या दुरूस्त करता आल्या पाहिजेत. अर्थात त्यामागे बाबांची पुण्याई होती. म्हणूनच गडाचा कायापालट शक्य होऊन आज गड विकासाकडे वाटचाल करीत उभा आहे. भगवान शिक्षण संस्थेसारखे हाल गडाचे होऊ नये, म्हणून आपण गडावरचे राजकारण बंद केले. ती कोणा एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही. काही लोक बाबांची ताकद मानायला तयार नाहीत. ज्या घरात आपण राहतो, त्या घरातला घरमालक समजला, तरच घराचे घरपण राहते. आपण पारमार्थिक जगात वावरतो. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक जग समजत नाही. त्यामुळे काही चुका घडल्या असतील, पण सुज्ञ आणि व्यावहारिक पिढीवर आपला आजही विश्वास आहे.’असेही नामदेवशास्त्री म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव