कोणीही सामाजिक न्यायापासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:46+5:302021-02-22T04:14:46+5:30

नेवासा : कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याची जात, धर्म, पंथ, भाषा किंवा प्रदेश वा इतर कारणाने सामाजिक न्यायापासून वंचित ठेवता ...

No one will be deprived of social justice | कोणीही सामाजिक न्यायापासून वंचित राहणार नाही

कोणीही सामाजिक न्यायापासून वंचित राहणार नाही

Next

नेवासा : कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याची जात, धर्म, पंथ, भाषा किंवा प्रदेश वा इतर कारणाने सामाजिक न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही असे राज्यघटनेत नमूद केले आहे, असे प्रतिपादन येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी केले.

नेवासा न्यायालयात साजरा केलेल्या जागतिक सामाजिक न्यायदिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी न्यायाधीश बी. यू. चौधरी,

न्या. एस. डी. सोनी, न्या. जे. आर. मुलाणी, न्या. पी. व्ही. राऊत, न्या. ए. बी. निवारे, ॲड. के. एच. वाखुरे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, मे. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात तृतीयपंथी व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे उदाहरण म्हणता येईल. जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यासाठी जगातील अनेक देश संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करत आहेत.

कार्यक्रमास अधीक्षक एस. जे. लांबदाडे, आर. व्ही. वाव्हळ, एस. एस. उलाने, किशोर चामुटे हजर होते.

---

२१ नेवासा न्यायालय

नेवासा न्यायालयात जागतिक सामाजिक न्यायदिन कार्यक्रमप्रसंगी बोलताना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव.

Web Title: No one will be deprived of social justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.