नेवाशाच्या शिक्षकांनी जमविला पाच लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:21 AM2021-05-14T04:21:37+5:302021-05-14T04:21:37+5:30
नेवासा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने कोविड १९च्या उपचारांसाठी साडेपाच लाखांचा निधी संकलित केला. रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक ...
नेवासा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने कोविड १९च्या उपचारांसाठी साडेपाच लाखांचा निधी संकलित केला. रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या गोळ्या व औषधे प्रांताधिकारी गणेश पवार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केली.
यापूर्वीही शिक्षक संघटनेने ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजनचे ५ बेड व कोविड सेंटरला ३० बेड देण्यात आलेले होते. ग्रामीण रुग्णालयाला नव्याने अंदाजे दोन लाख रुपये खर्चाचे पत्र्याचे शेड देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने सांगितले.
यावेळी राजेंद्र मुंगसे, रामेश्वर चोपडे, भास्कर नरसाळे, संदीप जंगले, दशरथ ढोले, संजय खरे, संजय लाड, रामेश्वर शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून भरीव निधीचे संकलन करण्यात आले.