शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नगर मनपा निवडणूक २०१८ : आघाडीचा निर्णय लांबल्याने इच्छुक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:55 AM

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांच्या याद्या तयार आहेत.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांच्या याद्या तयार आहेत. मात्र आघाडीचा निर्णय न झाल्याने उमेदवारी दाखल करण्यास विलंब होत असून, दोन्ही काँग्रेसच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. आ. संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात शनिवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.धुळे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे़ आघाडीचा निर्णय होऊन जागा वाटपाची प्रक्रिया दोन्ही काँग्रेसने पूर्ण केली आहे. अहमदनगर महापालिकाही एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये झाला आहे. परंतु, आघाडीची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन यादीही तयार केली आहे. या यादीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चेची पहिली फेरीही पार पडली. काँग्रेसकडून जागेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही.  काँग्रेसने राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचे अधिकार डॉ. सुजय विखे यांना दिले आहेत. परंतु, विखे यांच्याकडून राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. मात्र आघाडीबाबत अंतिम निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीचीही अडचण झाली आहे. इच्छुकांच्या मुलाखती होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटून गेला. पण, इच्छुकांना अद्याप निरोप मिळालेला नाही़ जागा वाटपात काँग्रेसला जागा सुटल्यास अडचण होईल. म्हणून काहींनी अर्ज घेऊन ठेवले़ परंतु, ते भरले नाहीत. काँगे्रसचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.नगर शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे़ त्यामुळे ६८ पैकी सर्वाधिक जागांवर उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. मात्र काँग्रेसही सहजासहजी हार मानणार नाही़. त्यामुळे ऐनवेळी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. धुळे महापालिकेतही राष्ट्रवादीला जास्तीच्या जागा देण्यात आल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती नगर महापालिकेतही होण्याची शक्यता आहे. त्यावर अद्याप मोहर उमटलेली नसल्याने इच्छुक धास्तावले आहेत.आॅनलाईनमुळे ऐनवेळी धावपळमहापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पध्दत वेळखाऊ आहे. ऐनवेळी हिरवा कंदील मिळाल्यास अर्ज दाखल करणे शक्य होणार नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका