शेतीच्या वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:07+5:302020-12-31T04:22:07+5:30

नेवासा : तालुक्यातील गोधेगाव शिवारात शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने एकाच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली असून, याबाबत नेवासा ...

Murder of one in a farm dispute | शेतीच्या वादातून एकाचा खून

शेतीच्या वादातून एकाचा खून

Next

नेवासा : तालुक्यातील गोधेगाव शिवारात शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने एकाच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली असून, याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे (रा. गोधेगाव, ता. नेवासा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मंगळवारी (दि.२९) सायंकाळी सहाच्या सुमारास महेश ऊर्फ महेंद्र गुलाबराव

भिंगारदे याने ठोंबरे यांच्या शेतजमिनीच्या वादाच्या रस्त्यावर मुरुमाचे ढंपर खाली केले. त्याचे ढीग रस्त्यावर पडलेले होते. त्यामुळे ज्ञानेश्वर व दत्तात्रय ठोंबरे हे ट्रॅक्टर घेऊन ते ढीग दूर करत होते. त्यावेळी अक्षय महेंद्र भिंगारदे, भूपेंद्र महेश ऊर्फ महेंद्र भिंगारदे हे दोघे आले. त्यांच्याकडे लाकडी दांडा, कुऱ्हाड होती. त्यांनी शिवीगाळ करत मुरूम पांगविण्यास विरोध केला. त्यानंतर राजेंद्र वसंतराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, महेश ऊर्फ महेंद्र गुलाबराव भिंगारदे हे तेथे आले व शिवीगाळ करू लागले. त्यांनी दत्तात्रय यांना जमिनीवर पाडले. कुऱ्हाडीने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारहाण केली. त्यात त्यांचे डोके फुटून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना दत्तात्रय ठोंबरे यांचा मंगळवारी (दि.२९) रात्री ११ वाजता मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे (गोधेगाव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून भूपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिगारदे, महेंद्र गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे, राजेद्र वसंतराव भिंगारदे (सर्व रा. गोधेगाव, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Web Title: Murder of one in a farm dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.