खासदार सुजय विखे यांनी दिला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी कोटी रूपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:48 PM2020-04-03T12:48:51+5:302020-04-03T12:50:13+5:30

कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी (दि.३मार्च) सांगितले.

MP Sujay Vikhe provided funds for the Prime Minister's Assistance Fund | खासदार सुजय विखे यांनी दिला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी कोटी रूपयांचा निधी

खासदार सुजय विखे यांनी दिला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी कोटी रूपयांचा निधी

googlenewsNext

अहमदनगर : कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी (दि.३मार्च) सांगितले.
याबाबत खासदार विखे यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून कोरोनाचे संकट रोखण्याचे उपाय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दुसरीकडे कोरोना बाधीतांच्या उपायांकरीता पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहनाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था आणि सामान्य नागकि पुढे आले आहेत.पंतप्रधानाच्या या सहाय्यता निधीत योगदान म्हणून आपणही १कोटी रूपयांचा  निधी जमा करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे डॉ.विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आपण विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे.प्रत्येक  मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले आहेत.मतदारसंघातील जे नागरिकइतर ठिकाणी अडकले आहेत.त्यांना आहे त्या ठिकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले असल्याचेही विखे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: MP Sujay Vikhe provided funds for the Prime Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.