शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

विवाहितेचा खून : पती आणि सासऱ्यास जन्मठेप, सासूला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 9:32 PM

विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती व सास-याला जन्मठेप तर सासूला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली.

अहमदनगर : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती व सास-याला जन्मठेप तर सासूला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली. तसेच पती व सासरा यांना प्रत्येकी ५० हजार व सासूला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.नगर तालुक्यातील हिवरे झरे येथील सारिका नवनाथ काटे हिला ९ मार्च २०१६ रोजी तिचा पती नवनाथ, सासरा शिवाजी यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. तर सासू पार्वतीबाई ही सारिकाचा छळ करीत होती. या घटनेत सारिका गंभीर भाजली होती. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कान्स्टेबल वाघ यांनी सारिका हिचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदविला होता. उपचारादरम्यान सारिका हिचा मृत्यू झाला. त्यामुळे पती नवनाथ, सासरा शिवाजी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर सासूवर सारिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरुन कलम १०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी घटनेचा पूर्ण तपास करुन तिन्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण ९ जणांची साक्ष घेण्यात आली तर आरोपींच्यावतीनेही बचावाचा साक्षीदार तपासण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. परंतु त्यांनी तो अर्ज काढून घेतल्यानंतर या खटल्याचा अंतिम युक्तीवाद झाला. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने सारिका हीचा पती नवनाथ व सासरा यांना जन्मठेपेची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सासू पार्वती हिला सात वर्षांची सक्तमजुरी व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम सारिका हिच्या दोन मुलांचा सांभाळ करणारा तिचा भाऊ मनोज ज्ञानेश्वर खरात यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. अनिल सरोदे यांनी बाजू मांडली़ त्यांना अ‍ॅड़ संदीप डापसे यांनी सहकार्य केले.मुलासमोरच जाळले होते आईलाया खटल्यात एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली़ मयत सारिका हिचा मुलगा पवन याच्यासमोरच सारिकाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्यात आले होते. त्यामुळे या खटल्यात पवनची साक्ष महत्वाची ठरली. राजकीय घराण्याला कठोर शिक्षासारिका हिला जाळून मारणारा सासरा शिवाजी विठोबा काटे हा हिवरे झरे (ता़ नगर) ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आहे़ तर सासू पार्वतीबाई ही देखील माजी सरपंच आहे. सारिकाचा पती नवनाथ हा एका माजी मंत्र्याचा ड्रायव्हर होता. त्यामुळे त्यांचे राजकारणात वजन होते़ मात्र, पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी राजकीय दबाव झुगारुन घटनेचा तपास योग्य पद्धतीने केला. सर्व साक्षी-पुरावे न्यायालयात सादर केले.  हे साक्षी-पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने या राजकीय घराण्याला जन्मठेपेची व सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच महिलांवरील अत्याचाराबाबत तीव्र शब्दात न्यायालयात ताशेरे ओढले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हाCourtन्यायालय