Man kills teenager at Kolhar | कोल्हार येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हार येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हार :  येथील राहाता तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद भागवत सुरसे (वय ५२) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
कोल्हार येथे मयत ताराचंद सुरसे यांचे अनेक वर्षांपासून बाजारपेठेत सलूनचे दुकान आहे. त्यांची पत्नी आईच्या मृत्युमुळे माहेरी गेली होती. तर घरातील मुले व इतर सर्व बाहेर गेली होती. घरात आई व मयत ताराचंद यांच्याशिवाय कुणीही नव्हते. गुरुवारी दुपारी बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलेल्या ताराचंद यांच्या रूमचा दरवाजा उघडत नसल्याने घरातील व्यक्तींने शेजाºयांना आवाज दिला. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने गल्लीतील युवकांनी दरवाजा तोडला असता ताराचंद सुरसे यांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत ताराचंद यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, नात असा परिवार आहे.

Web Title: Man kills teenager at Kolhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.