Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:12 AM2019-09-20T05:12:36+5:302019-09-20T05:13:06+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - मी दुसऱ्यांच्या नातवांचे लाड का पुरवू’ हे लोकसभा निवडणुकीतील शरद पवार यांचे विधान राज्यात गाजले.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - radhakrishna vikhe commentary on pawar family | Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला?

Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला?

Next

अहमदनगर : ‘मी दुसऱ्यांच्या नातवांचे लाड का पुरवू’ हे लोकसभा निवडणुकीतील शरद पवार यांचे विधान राज्यात गाजले. या विधानातून पवारांनी दिवंगत बाळासाहेब विखे यांचे नातू सुजय यांना जाहीरपणे राजकीय विरोध केला होता. आता पवारांचे नातू रोहित यांना रोखण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे मैदानात उतरले आहेत.
रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील ‘कर्जत-जामखेड’ या मतदारसंघातून इच्छुक आहेत. गावोगावी भेटी देऊन ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांचे आगमन झाल्याने राष्ट्रवादीतील सर्व स्थानिक इच्छुकांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेतला आहे. त्यांची लढत मंत्री राम शिंदे यांच्याशी आहे. या मतदारसंघावर अनेक वर्षांपासून भाजपची पकड आहे. फडणवीस सरकारच्या काळात शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणला. स्थानिक नेत्यांना त्यांनी दोन वेळा पराभवाची धूळ चारली आहे. त्यांना रोखायचे असेल तर एकास एक उमेदवार देण्याची रणनिती यावेळी राष्ट्रवादी अवलंबत आहे. कर्जत-जामखेड मधील स्थानिक विरोधकांत एकजूट होत नाही हे पाहून पवारांनी ‘रोहित फॉर्म्युला’ पुढे केला आहे. लोकसभेला पवारांनी सुजय विखे यांच्यासाठी नगर मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. ‘दुसऱ्यांच्या नातवांचे लाड का पुरवू ?’ ही टीका पवार यांनी केली होती.

>मुख्यमंत्रीही पाठीशी
कर्जत-जामखेडच्या विकासासाठी स्थानिक लोक सक्षम आहेत. बाहेरच्यांची गरज काय? अशी टीका मंत्री विखे यांनी पवारांवर केली आहे.
शिंदे यांची या मतदारसंघावर स्वत:ची पकड आहेच. त्यांना आता विखेंचीही ताकद मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत शिंदे हे पुढील मंत्रिमंडळातही मंत्री राहतील, असे जाहीर केले आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - radhakrishna vikhe commentary on pawar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.