औरंगाबादच्या मास्टरमाइंडने नगर केंद्रातून फोडली ‘महाजेनको’ परीक्षेची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 03:11 PM2017-11-14T15:11:33+5:302017-11-15T11:00:56+5:30

महाविज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी आॅनलाईन परीक्षा देणा-या उमेदवारांना मायक्रो इअरफोन, ब्ल्यू टूथ आणि मोबाईलच्या माध्यमातून आॅनलाईन उत्तरे सांगणा-या रॅकेटचा रविवारी औरंगाबाद (मुकुंदवाडी) पोलिसांनी पर्दाफाश केला असून नगर केंद्रावरून प्रथम प्रश्नपत्रिका फोडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

'Mahagenco' test papers broke out in city center by mastermind of Aurangabad | औरंगाबादच्या मास्टरमाइंडने नगर केंद्रातून फोडली ‘महाजेनको’ परीक्षेची प्रश्नपत्रिका

औरंगाबादच्या मास्टरमाइंडने नगर केंद्रातून फोडली ‘महाजेनको’ परीक्षेची प्रश्नपत्रिका

Next

अहमदनगर : महाविज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी आॅनलाईन परीक्षा देणा-या उमेदवारांना मायक्रो इअरफोन, ब्ल्यू टूथ आणि मोबाईलच्या माध्यमातून आॅनलाईन उत्तरे सांगणा-या रॅकेटचा रविवारी औरंगाबाद (मुकुंदवाडी) पोलिसांनी पर्दाफाश केला असून नगर केंद्रावरून प्रथम प्रश्नपत्रिका फोडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नगर केंद्रावर कोण परीक्षार्थी होते़ आॅनलाईन प्रश्नपत्रिका कुणी फोडली आणि या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे हे शोधण्यासाठी सोमवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पथक नगरमध्ये दाखल झाले.
शासनाच्या महाजेनको कंपनीने लिपिकपदासाठी रविवारी (दि. १२) राज्यात विविध जिल्ह्यात आॅनलाईन परीक्षा घेतली. नगर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते़ लिपिकपदासाठी अर्ज दाखल करणा-या उमेदवारांना या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण करण्याची जबाबदारी औरंगाबाद येथील अर्जुन घुसिंगे याने घेतली होती. यासाठी त्याने उमेदवारांकडून प्रत्येकी सात ते आठ लाख रुपयांचा सौदा केला होता. यातील ४० टक्के रक्कम अ‍ॅडव्हॉन्स तर उर्वरित रक्कम परीक्षेच्या निकालानंतर देणे, असा हा व्यवहार होता. उमेदवारांकडून उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी अर्जुनने उमेदवारांची ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रे त्याच्याकडे तारण म्हणून ठेवून घेतली होती. नंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यापासून ते परीक्षा सेंटर निवडणे, मायक्रो फोन, इअरफोन त्याने पुरविले होते़ तसेच परीक्षेत तो कशी मदत करील याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवीत असे. गोपनीय पद्धतीने हे काम चालत.
घुसिंगे याच्या सांगण्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांनी अहमदनगर येथील परीक्षा केंद्र निवडले होते़ या रॅकेटबाबत औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाली होती़ पोलिसांनी औरंगाबाद शहरातील मयूरबन कॉलनी येथील एका इमारतीत छापा टाकला तेव्हा तेथे आठ ते दहा तरूण निदर्शनास आले़ हे तरूण मोबाईलच्या माध्यमातून राज्यातील विविध केंद्र्रांवर परीक्षा देणा-यांना हे दहा जण पुस्तकातून शोधून आॅनलाईन उत्तरे सांगत होते़ यावेळी पोलिसांनी जीवन गिरजाराम जघाळे (२१, रा. पाचपीरवाडी, ता. गंगापूर), नीलेश कपूरसिंग बहुरे (२३, रा. गेवराईवाडी, ता. पैठण) आणि पवन कडूबा नलावडे (११, रा. आपत भालगाव, ता. औरंगाबाद) आणि दत्ता कडूबा नलावडे यांना ताब्यात घेतले़ यावेळी अर्जुन घुसिंगे व त्याचा साथीदार गोविंदसह पळून गेले़ पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ या प्रकरणी आता नगरमध्ये तपास सुरू झाला आहे.

उमेदवाराला मिळाली पाच मिनिटात आॅनलाईन उत्तरे

उमेदवार केवळ मायक्रो ब्ल्यू ट्रुथ कानात आतमध्ये घालून परीक्षा हॉलमध्ये जात. तर मायक्रो जीएसएम फोन ते त्यांच्या बॅगमध्ये परीक्षा हॉलबाहेर ठेवत. या ब्ल्यू ट्रुथच रेंज मयार्दा ५०० फुट असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे मायक्रो फोन औरंगाबादेतून कॉल करून उत्तरे सांगणाºयाच्या एका रिंगनंतर अ‍ॅटोमेटिक ब्ल्यु ट्रुथशी कनेक्ट होत. औरंगाबादेतील रूममध्ये बसलेले तरूण केवळ प्रश्न नंबर आणि त्याच्या उत्तराचा क्रमांक वेगात सांगत. यामुळे अवघ्या पाच ते सहा मिनीटात उमेदवाराला अचूक उत्तरे मिळत. पोलीसांनी कारवाईदरम्यान अर्जून याचा एक मोबाईल आणि लॅपटॉपची बॅग रूमध्ये पडली. ही बॅग, सहा मोबाईल, उमेदवारांना उत्तरे सांगण्यासाठी वापरण्यात येणारी स्पर्धा परीक्षेसंबंधीची आठ ते दहा पुस्तके पोलिसांनी जप्त केली.

स्पाय कॅमे-याने ई-मेलद्वारे पाठविली प्रश्नपत्रिका

अर्जून घुसिंगे याने अत्यंत महागडे अशी मायक्रो ब्ल्यू टूथ, वायरलेस सुपर स्मॉल मायक्रो ईअरफोन (न दिसणारे)असे साहित्य आॅनलाईन खरेदी केलेले आहे. हे साहित्य अंतरवस्त्रात सहज लपवून त्याच्याशी कनेक्ट असलेल्या उमेदवारांना देऊन परीक्षा केंद्रात पाठविले. आॅनलाईन परीक्षा सुरू होताच एक उमेदवार त्याच्याकडील मायक्रो स्पाय कॅमेरा चालू करीत. हा कॅमेरा प्रश्नपत्रिकेसमोर नेताच तो कॅमेरा प्रश्नपत्रिका स्कॅन करून ईमेलद्वारे अर्जूनच्या ई-मेलवर येत. प्रश्नपत्रिका प्राप्त होताच रूममध्ये बसलेले आठ ते दहा जण त्यांच्याकडील गाईडचा वापर करून उत्तरे शोधून काढत. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर ते त्यांच्याशी कनेक्ट असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मायक्रो ईअरफोनवर संपर्क साधून त्यांना उत्तरे सांगत.

Web Title: 'Mahagenco' test papers broke out in city center by mastermind of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.