शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पुन्हा लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, प्रशासनाच्या निर्णयाकडे नगरकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:00 AM

‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात नगरमध्ये आता पुन्हा लॉकडाऊनची गरज, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़.  शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका प्रशासन आले आहे़. यासंदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवकांशी प्राथमिक चर्चा केली़.

अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे़  कोरोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन एकजुटीने आजपासून मैदानात उतरले आहे. कोरोनाची महाभयंकर साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, यावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये प्रथमच चर्चा झाली़  शहरातील सर्व घटकांचा विचार करूनच पुढील निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले़.

‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात नगरमध्ये आता पुन्हा लॉकडाऊनची गरज, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़.  शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका प्रशासन आले आहे़. यासंदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवकांशी प्राथमिक चर्चा केली़.

 यावेळी शहरातील परिस्थिती हाताळण्याबाबत सविस्तर चर्चा झाली़  आयुक्त मायकलवार यांनी शहरातील वाढत्या आकडेवारीची माहिती देऊन उपलब्ध वैद्यकीय सुविधांकडे लक्ष वेधले़.  नागरिकांच्या बेफिकिरीबाबत प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली़.  त्यामुळे संसर्ग झपाट्याने होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़.  दररोज एक परिसर झोन म्हणून जाहीर करावा लागत आहे़.  त्यामुळे निम्मे शहर कंटेनमेंट झोनमध्ये आहे़.  उर्वरित भागातही दररोज रुग्णांचे निदान होत आहे़  ही परिस्थिती अशीच राहिल्यास कठीण प्रसंगाला नगरकरांना सामोरे जावे लागेल़.  त्यामुळे वेळीच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी सांगितले़.  यावर झालेल्या चर्चेतून जनता कर्फ्यू या दुसºया पर्यायावरही चर्चा झाली़.

जनता कर्फ्यू लागू केल्यास नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळणे गरजेचे आहे़  कर्फ्यूत अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, याचाही विचार करावा लागेल़.  लॉकडाऊन करायचा झाल्यास तो किती दिवस करावा, या काळात हातावर पोट असणाºयांचे काय, त्यांची होणारी उपासमार कशी टाळता येईल, यावर लोकप्रतिनिधींनी मते व्यक्त केली़.  रुग्ण वाढल्यास काही मोठ्या इमारती ताब्यात घेऊन तिथे रुग्णांची व्यवस्था करण्याचे ठरले़.  त्यासाठी इमारती उपलब्ध करण्यासाठी आमदार जगताप इमारत मालकांशी चर्चा करणार आहेत़.  

आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणू - जगतापनगर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये़.  पुढील आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणू, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला़. अधिकाºयांच्या बैठका घेऊन सूचना करण्यात आलेल्या आहेत़.  त्यानुसार कामाला सुरुवात झालेली आहे़  कोविड चाचणी केंद्रही महापालिकेमार्फ त सुरू करण्यात आले आहे़.  

पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे़.  अचानक रुग्णांची संख्या वाढल्यास त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. आयुर्वेद महाविद्यालयही रुग्णांसाठी खुले करण्यात येणार आहे़  तिथे ५० हून अधिक रुग्णांची व्यवस्था होईल़.  ही इमारतही कमी पडल्यास लेबर फेडरेशनची नवी व सुसज्ज इमारतही ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे़.  तिथे काटेकोर नियोजन करून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील़.  कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही जगताप यांनी  ‘लोकमत’ला सांगितले. 

 

वाढती रुग्ण संख्या पाहता काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केली़  या चर्चेदरम्यान लॉकडाऊन न करता जनता कर्फ्यू पाळण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली़  यापैकी कोणता निर्णय घ्यायचा ते लोकप्रतिनिधी व महापालिकेतील प्रमुख अधिकारी आणि वरिष्ठांशी चर्चा करूनच ठरविले जाईल़  

 - श्रीकांत मायकलवार, आयुक्त

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका