शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

गोदावरीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 10:58 PM

कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरले

कोपरगाव : नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून रात्री दहा वाजता  २ लाख ९१ हजार इतके क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरीने रुद्रावतार धारण करत पूररेषा ओलांडून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.रविवारी कोपरगाव शहरातील नदीकाठचे बाजारतळ, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्वे न १०५, मोहिनीराजनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने रविवारी दुपारपासूनच येथील १०० ते १२० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सायंकाळी शहरातील नदीवरील पूल पाण्याखाली गेला तसेच शहरातील खंदकनाल्याला देखील पूर आल्याने रात्री उशिरा शहरात पाणी शिरले होते.तालुक्यातील गोदावरी काठच्या ८ गावातील ५९ कुटुंब व २९५ व्यक्ती ग्रामपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा, मित्रमंडळ, सामाजिक संस्था यांच्या मदतीने नदीकाठी पूररेषेत असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवून राहण्याची व्यवस्था केली. प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गोदावरी नदीवरील मंजूर येथील बंधाऱ्यांचा भराव वाहून गेल्याचे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पूरपरिस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, समन्वयक सुशांत घोडके यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष तसेच त्यांच्या यंत्रणेमार्फत नागरिकांची मदत सर्वच मदत केली.गोदावरी काठच्या श्रीरामपूर तालुक्यातील ६ गावातील १६३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील घोगरगावमधील 27 कुटुंब 157 लोकसंख्या, जेनपूर-75 कुटुंब 263 लोकसंख्या, सुरेगाव-8 कुटुंब 32 लोकसंख्या, उस्थळ-3 कुटुंब 13 लोकसंख्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित केली आहे. राहाता तालुक्यातील १४१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीRainपाऊस