शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

कार्तिक अमावस्येनिमित्त शिंगणापुरात शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 5:39 PM

कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली.

नेवासा : कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली.शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व आॅस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेश कुमार यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. शनिवारी पहाटे त्रिंबक महाराज, डॉ. राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त जयेश शाह यांच्या हस्ते आरती झाली. शुक्रवारी दुपारी प्रारंभ झालेली अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत होती. त्यामुळे शनिवारी सायंकाळपूर्वीच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दिवसभर दर्शनपथ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.शनिवारी सकाळपासून गर्दी वाढली. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले होते. देवस्थानमार्फत पिण्याचे पाणी, आरोग्य, तातडीची अ‍ॅम्बुलन्स सेवा यासारख्या सुविधा भाविकांसाठी करण्यात आल्या होत्या.दिल्ली, शिरसा, हरियाणा येथील शनिभक्तांनी भाविकांसाठी मोफत चहा, नाष्टा व जेवणाचे वाटप केले. संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथील सुमारे ५० युवकांनी शनी शिंगणापूर येथून पायी ज्योत घेऊन गेले. देवस्थानचे अधिकारी व सर्व विभागातील कर्मचा-यांनी शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर अविरत कष्ट घेऊन यात्रा काळात सर्व व्यवस्था सुव्यवस्थित संभाळली. दिवसभरात अभिनेते आदेश बांदेकर, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्यासह देशातील विविध राज्यातील पद्धधिकारी, अधिकाºयांनी शनिदर्शन घेतले. देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, डॉ़ रावसाहेब बानकर, विश्वस्त अप्पासाहेब शेटे, आदिनाथ शेटे, शालिनी लांडे, उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी दानशूर शनिभक्तांचा देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला. शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या संगीता राऊत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूरNevasaनेवासा