शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात रंगणार नामवंत मल्लांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 6:55 PM

कुस्ती प्रिमीयर लीगमध्ये महाराष्ट्र केसरी, कुमार केसरी तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या मल्लांना संधी मिळणार आहे़

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील मल्लांसह १६ राष्ट्रीय व १६ आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग

अहमदनगर: महाराष्ट्रातील नामवंत आणि दर्जेदार मल्लांना व्यासपीठ मिळावे तसेच दुर्लक्षित होत असलेल्या कुस्तीला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशातून अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्यावतीने महाराष्ट्र कुस्ती प्रिमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या नोव्हेंबर महिन्यांत नगरसह कोल्हापूर, पिंपरी चिंचवड येथे या स्पर्धा होणार असल्याचे रविवारी स्पर्धेचे आयोजक व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़कुस्ती प्रिमीयर लीगमध्ये महाराष्ट्र केसरी, कुमार केसरी तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या मल्लांना संधी मिळणार आहे़ यामध्ये महाराष्ट्रातील मल्लांसह १६ राष्ट्रीय व १६ आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग राहणार आहे़ द ग्रेट खली व योगेश्वर दत्त हे या स्पर्धेचे ब्रॅण्डिंग करणार आहेत़ कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्टेडियममध्ये स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे पात्रता फेरी होऊन नगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात अंतिम फेरी रंगणार आहे़यावेळी संघाचे कार्याध्यक्ष राम लोंढे, सचिव धनंजय जाधव, नामदेव लंगोटे, दत्तात्रय अडसुरे, राम नळकांडे, नाना डोंगरे, हंगेश्वर धायगुडे, विलास चव्हाण, छबुराव जाधव आदी उपस्थित होते़६१ लाख रूपयांचे बक्षीसमहाराष्ट्र कुस्ती प्रिमियर लिग स्पर्धेत एकूण ६१ लाख रूपयांची बक्षिसे आयोजकांमार्फत देण्यात येणार आहेत़ यामध्ये प्रथम विजेत्या संघाला २१ लाख रूपये व अर्धा किलो सोन्याची गदा देण्यात येणार आहे़ प्रथम बक्षीस उद्योजक सायरस पुनावाला यांच्यावतीने देण्यात येणार आहे़ द्वितीय बक्षीस ११ लाख रूपये रोख व पाच किलो चांदीची गदा देण्यात येणार आहे़ तृतीय बक्षीस ७ लाख रूपये व चषक देण्यात येणार आहे़....या मल्लांचा राहणार सहभागराहुल आवारे (पुणे), उत्कर्ष काळे (पुणे), माउली जमधाडे (सोलापूर), किरण भगत (सातारा), सागर बिराजदार (लातूर), बाला रफिक शेख (सोलापूर) राकेश कुमार (मुंबई), संदीप काटे (मुंबई), गोपाळ यादव (मुंबई), मारूती जाधव (सांगली), अनिल जाधव (जालना), विष्णू खोसे (अहमदनगर), किशोर नखाते (पिंपरी चिंचवड), विजय पाटील (कोल्हापूर), अजित शेळके (अहमदनगर), संतोष गायकवाड (अहमदनगर), विक्रम शेटे (अहमदनगर), संग्राम पाटील (कोल्हापूर), विकास जाधव (सोलापूर), जयदीप गायकवाड (सातारा), समीर देसाई (कोल्हापूर), रणजित नलावडे (कोल्हापूर), नामदेव कोकाटे (पुणे) शिवराज राक्षे (पुणे)़