कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:28 PM2020-09-02T14:28:33+5:302020-09-02T14:29:15+5:30

बोटा : कचनदीवरील कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरण मंगळवारी पुर्ण क्षमतेने भरले. या धरणाचे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

Kotmara Dam filled to full capacity. | कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले.

कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले.

Next

बोटा : कचनदीवरील कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरण मंगळवारी पुर्ण क्षमतेने भरले. या धरणाचे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

 कच नदीचे उगमस्थान असलेल्या ब्राह्मणवाडा पाणलोट क्षेत्रातही ऑगस्ट महिन्याचे मध्यानंतर दमदार मोसमी पाऊस झाला यामुळे त्या परिसरातील या नदीवरील बंधारे भरून खालील बेलापुर बदगी प्रकल्पात पाणी आले. ऑगस्ट महिन्याचे शेवटच्या आठवड्यात हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला व पाणी परिसरातील कोटमारा धरणात येण्यास सुरवात झाली 

  दरम्यान मंगळवारी सकाळी सुमारे 1 हजार 155 दशलक्ष क्षमता असलेले कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले. यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

फोटो ओळी.  

पुर्ण क्षमतेने भरलेले कोटमारा धरण भरून वाहू लागले. 

Web Title: Kotmara Dam filled to full capacity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.