Karjat-Jamkhed: | कर्जत -जामखेड : गेल्यावेळी राष्ट्रवादीने डावलल्यानं आता उमेदवारी मिळायलाच हवी : राजेंद्र गुंड
कर्जत -जामखेड : गेल्यावेळी राष्ट्रवादीने डावलल्यानं आता उमेदवारी मिळायलाच हवी : राजेंद्र गुंड

कुळधरण (ता.कर्जत) : राष्ट्रवादीत अनेक वर्षापासून काम करत आहे. जिल्हा परिषद गटातही ३० वर्षापासून आमचा सदस्य आहे. आम्ही विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काहींना पोटशूळ उठला आहे, अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांनी केली.
कुळधरण (ता. कर्जत) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुबारक मोगल होते. गुंड म्हणाले, २००९ मध्ये भाजपमध्ये असतानाही आमदारकीची संधी हुकली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत गेलो. प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. २०१४ च्या निवडणुकीवेळी राष्टÑवादीनेही आम्हाला डावलले.
सध्या आगामी निवडणुकीसाठी राष्टÑवादीकडून रोहित पवार हेही इच्छुक आहेत. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असल्याने आम्हालाच उमेदवारी मिळायला हवी, असा दावा गुंड यांनी केला. यावेळी उमेश परहर, त्रिमुर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, मधुकर घालमे, संदीप बोराटे, लहू वतारे, शिवाजी सुद्रीक, बाळासाहेब थोरात, अरूण लामटुळे, ओंकार गुंड, सूर्यभान सुद्रिक, सुरेश पोटरे, चमस थोरात, मोहन गोडसे आदी उपस्थित होते.


Web Title: Karjat-Jamkhed:
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.