कर्जत - जामखेडला मिळणार आणखी ६५० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:52+5:302021-04-12T04:19:52+5:30

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात लक्ष घातले आहे. पुणे-मुंबईच्या ...

Karjat - Jamkhed will get another 650 beds | कर्जत - जामखेडला मिळणार आणखी ६५० बेड

कर्जत - जामखेडला मिळणार आणखी ६५० बेड

Next

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात लक्ष घातले आहे. पुणे-मुंबईच्या धर्तीवर कर्जत येथे ३५० व जामखेड येथे ३०० बेडचे कोविड सेंटर ते उभारणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. गरजू रूग्णांसाठी त्यांनी तातडीने तीनशे रेमडेसिविर इंजेक्शनचीही व्यवस्था केली आहे.

नगर येथील जिल्हा रूग्णालयाला पाच हजार व कर्जत-जामखेड मतदार संघासाठीही पाच हजार एन-९५ मास्क त्यांनी उपलब्ध केले आहेत. याशिवाय कोरोना रूग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन सिलिंडर कर्जत, जामखेडसाठी प्रत्येकी २५ उपलब्ध केले आहेत. कर्जतजवळील गायकरवाडी येथे ३५० अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात येत असून, जामखेड येथेही ३०० बेडचे कोरोना सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. रोहित पवार यांनी जामखेड येथील प्रशासनाकडून कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर अरोळे हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या खुल्या जागेत २०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच तेथील सांस्कृतिक केंद्रात १०० बेड उपलब्ध केले आहेत. सध्या अरोळे हॉस्पिटलमध्ये ३५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांनी कोविड रूग्णांच्या सेवेसाठी सहभाग द्यावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

--

११ रोहित पवार

जामखेड येथे कोरोना रूग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन आमदार रोहित पवार यांनी प्रशासकीय अधिकारी, डॉ. अरोळे कोविड सेंटरच्या संचालकांबरोबर चर्चा केली.

Web Title: Karjat - Jamkhed will get another 650 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.