शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

राष्ट्रवादीला घरी बसवा-सुजय विखे; शिवाजी कर्डिलेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:51 PM

गेली दहा वर्षापासून कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. विकासासाठी आमदार कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. विरोधकांनी अनेक संस्था बंद पाडल्या आहेत. विरोधकांची कामे सर्वांना माहित आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. 

तिसगाव : गेली दहा वर्षापासून कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. विकासासाठी आमदार कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. विरोधकांनी अनेक संस्था बंद पाडल्या आहेत. विरोधकांची कामे सर्वांना माहित आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे रविवारी भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ  जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, संभाजीराव वाघ, महादेव कुटे पाटील, पृथ्वीराज आठरे, राजेंद्र तागड उपस्थित होते. विखे म्हणाले, राष्ट्रवादीने नेहमीच जिरवा जिरवीचे, गटातटाचे राजकारण केले. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना घरी बसवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकºयांच्या पैशावर डल्ला मारणा-या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल.  काशिनाथ लवांडे म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो. तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे, माजी सभापती मिर्झा मणियार, शिवसेना नेते रफिक शेख, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, एकनाथ आटकर, माजी सरपंच सुनील साखरे, भाऊसाहेब लोखंडे, विक्रमराव ससाणे, गहिनीनाथ खाडे, अरुण पुंड, उपसरपंच फिरोजभाई पठाण, सिराज पठाण, सरपंच अनिल गीते, अनिल पालवे, शिवसेना शहराध्यक्ष शरद शेंदुरकर, भरत गारुडकर, आबासाहेब काळे, शंकरराव उंडाळे, धीरज मैड, शिवाजी भाकरे, भाऊसाहेब क्षेत्रे, रावसाहेब वांढेकर, राजेंद्र दगडखैर, संतोष शिंदे, बाजीराव वारे, प्रदीप टेमकर, ताराबाई क्षेत्रे, इब्राहीम सय्यद, काकासाहेब लवांडे उपास्थित होते.  तनपुरे यांचे कट्टर समर्थक  राजेंद्र दगडखैर यांनी भाजपात प्रवेश केला.भाजप कामे करतो, नुसते बोलत नाही नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतक-याला वर्षाला सहा हजार रुपये खात्यावर टाकण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पाच वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतक-यांना मिळणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना थेट मानधन देण्याचा नवा संकल्प देशाचे पंतप्रधान मोदी यांनी राबवला म्हणून भाजपाला मत द्या, असे म्हणालो तर बिघडले कुठे? राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी शेतक-यांसाठी नऊ हजार कोटी रुपये दिले. त्याच्यावरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी पंधरा वर्ष मत मागितले. भाजप प्रत्यक्ष मदत करतो. नुसते बोलत नाही, असे विखे म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019