शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

जीव भांड्यात पडला, ‘त्या’ दोन बाळांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:21 AM

अहमदनगर- कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर त्या मातेचा दुसºया दिवशी मृत्यू झाला. बाळांचा जन्म होताच त्यांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्या दोन्ही बाळांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अहमदनगर- कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर त्या मातेचा दुसºया दिवशी मृत्यू झाला. बाळांचा जन्म होताच त्यांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्या दोन्ही बाळांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचाही जीव भांड्यात पडला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकाच दिवशी सात जण कोरोनाबाधित आढळले असल्याने एकीकडे चिंता वाढली आहे. मात्र या बाळांच्या अहवालाने एक सुखद बातमीही मिळाली आहे.निंबळक येथील कोरोनाबाधित महिलेने जुळया मुलांना जन्म दिला होता. कृत्रीम गर्भधारणा केलेल्या या महिलेची मुदतपूर्व सिझेरियन करून प्रसुती करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाळांची प्रकृती ठीक होती. जन्म होताच या मुलांना मातेपासून अलग करण्यात आले होते.  त्यानंतर त्या बाळांचे घशातील स्त्राव चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी आला. त्यात त्या बाळांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला. या मुलांची जिल्हा रुग्णालयात सध्या डॉ.चेतना बहुरुपी काळजी घेत आहेत.--नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे राहत आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातही दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील भारत् नगर आणि मोेमीनपुरा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी सात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे नगर शहरात चिंता वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाºयांची संख्या वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते.