जामखेडमध्ये पुन्हा तीन कोरोनाबाधीत; नगर जिल्ह्याचा आकडा ४३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:44 PM2020-04-26T13:44:19+5:302020-04-26T13:44:53+5:30

नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना बे्रक बसला असला तरी जामखेडमध्ये दिवसाआड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) आलेल्या ९ व्यक्तींच्या अहवालांपैकी जामखेडमधील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

In Jamkhed again with three corona; The number of Nagar district is 43 | जामखेडमध्ये पुन्हा तीन कोरोनाबाधीत; नगर जिल्ह्याचा आकडा ४३ वर

जामखेडमध्ये पुन्हा तीन कोरोनाबाधीत; नगर जिल्ह्याचा आकडा ४३ वर

googlenewsNext

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना बे्रक बसला असला तरी जामखेडमध्ये दिवसाआड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) आलेल्या ९ व्यक्तींच्या अहवालांपैकी जामखेडमधील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शनिवारी पाठविलेल्या अहवालांपैकी जामखेडमधील तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या ४३ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शनिवारी (दि.२५) ४१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित ०३ अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. त्यात, जमखेडमधील या तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ४५ आणि ५० वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला असे तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.

१५ अहवालांची प्रतीक्षा

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालांपैकी अजून १५ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १२२ जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएसमध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Web Title: In Jamkhed again with three corona; The number of Nagar district is 43

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.