पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी झोडपले;  आठ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:55 PM2020-05-05T12:55:06+5:302020-05-05T12:55:57+5:30

केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैध पाणी उपसा करीत होते. हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

Irrigation engineer beaten by farmers; Crime against eight people | पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी झोडपले;  आठ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा

पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी झोडपले;  आठ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा

Next

घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैध पाणी उपसा करीत होते. हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ शेतकºयांविरुध्द घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
 सोमवारी (४ मे) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांच्यासह चौकीदार के.एम.ढोमसे, डी.एम.आरोटे, महावितरणचे वायरमन मिसाळ, नितीन लामखडे हे केळेवाडी येथील धरणातील होणारा अवैध पाण्याचा उपसा बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील विद्युत पुरवठा बंद करीत असताना येथील लाभधारक शेतकरी राजू किसन लामखडे, एकनाथ दामू लामखडे, अनिल वसंत लामखडे, अतुल कोंडीभाऊ लामखडे, संतोष यमनाजी लामखडे, गणेश म्हतू लामखडे, उत्तम सोपान लामखडे, सुभाष धोंडिबा लामखडे (रा.सर्व केळेवाडी बोटा, ता.संगमनेर) हे सर्व कोरोनाची संचारबंदी लागू असताना विनापरवाना जमा झाले. त्यापैकी राजू किसन लामखडे, एकनाथ दामू लामखडे, संतोष यमनाजी लामखडे यांनी अभियंता रजनीकांत कवडे व सोबतचे कर्मचारी यांना मोटारींचे विद्युत कनेक्शन का तोडता? असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून कवडे यांना मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली आहे. घारगाव पोलिसांनी या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.
नोटिसा देऊनही पाणी उपसा सुरूच
 संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा परिसरातील केळेवाडी येथील लघु प्रकल्पातील १.१९ दशलक्ष घनफूट इतके पाणी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आरक्षित करण्यात आले होते. याबाबत येथील लाभधारक शेतकºयांना या धरणातील पाणी उपसा बंद करण्याबाबत संगमनेरच्या पाटबंधारे विभागाने २७ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. पाटबंधारे संगमनेर विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी ३० एप्रिल रोजी पुन्हा विद्युत मोटारी काढण्याबाबत तोंडी कळविले होते. त्यानंतर २ मे रोजी पुन्हा संबधित शेतकºयांना अंतरीम नोटीस देण्यात आली होती. असे असतानाही अवैध पाण्याचा उपसा सुरूच होता. 

Web Title: Irrigation engineer beaten by farmers; Crime against eight people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.