तिसगावच्या उपसरपंचपदी इलियास शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:47+5:302021-06-17T04:15:47+5:30
तिसगाव : तिसगाव (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इलियास शेख यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच फिरोज पठाण यांच्या निधनामुळे पद ...
![Ilias Sheikh as Deputy Panch of Tisgaon | तिसगावच्या उपसरपंचपदी इलियास शेख Ilias Sheikh as Deputy Panch of Tisgaon | तिसगावच्या उपसरपंचपदी इलियास शेख](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/ahmednagar-marathi-default-image-0_202012528124.jpg)
तिसगावच्या उपसरपंचपदी इलियास शेख
तिसगाव : तिसगाव (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इलियास शेख यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच फिरोज पठाण यांच्या निधनामुळे पद रिक्त होते. बुधवारी सकाळी सरपंच काशिनाथ लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली या नियुक्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. सदस्या शबाना शौकत पठाण, लालबी इलियास पठाण, इलियास शेख या तिघांनी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. चर्चेनंतर पठाण यांनी अर्ज माघारी घेतले. सरपंच लवांडे यांनी इलियास शेख यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. शेख यांनी यापूर्वी दहा वर्षे उपसरपंच म्हणून कामकाज केले आहे. ग्रामपंचायत सदस्य अमोल वाबळे, अविनाश नरवडे, पद्माकर पाथरे, लालबी पठाण, शबाना पठाण, मनीषा नरवडे, संगीता वाघमारे, अर्शद शेख, भाऊसाहेब लवांडे, हाजी रफिक शेख, सुनील पुंड, नितीन लवांडे, शौकत पठाण, वहाब इनामदार, अंबादास शिंदे, बब्बू पठाण, पापाभाई तांबोळी, सुनील लवांडे उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले.
--
१६ इलियास शेख