Hotel driver with police sub-inspector caught taking bribe of Rs 30,000 | तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात 

तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात 

जामखेड : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामध्ये हॉटेल चालकासह पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. 

    याबाबत माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या भावास जामखेड गु.र.नं ६९८/२०२० या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. यानंतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाखांची मागणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी केली होती. यानंतर तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले.  हे पैसे आरोपी नंबर दोन तुकाराम ढोले याच्याकडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितले.

     मात्र फिर्यादी याने पैसे देण्याच्या आगोदर ४ जानेवारी रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या नुसार  ५ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने जामखेड पोलीस स्टेशनला येऊन लाचेबाबत खात्री करून घेतली. त्यानुसार लाचेची मागणी करण्यात आली सल्याचे निष्पन्न झाले. यानंतर  ५ जानेवारी रोजी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगररोड वरील  आरोपी नंबर दोन तुकाराम ढोले याच्या हॉटेल कुष्णा या ठिकाणी सापळा लावला. त्यानुसार हॉटेल कुष्णा येथे तक्रारदार यांच्याकडून तुकाराम ढोले यांच्याकडे तीस हजार रुपयांची रक्कम देताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता ती रक्कम पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांच्या सांगण्यावरून घेतली असल्याचे सांगितले. त्यानुसार तातडीने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

   याप्रकरणी कैलास ढोले (रा. मोरेवस्ती, जामखेड) व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Hotel driver with police sub-inspector caught taking bribe of Rs 30,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.