विद्यामंदिर उभारणीस माजी महिला सरपंचाने दिले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:31+5:302021-03-09T04:24:31+5:30

चिचोंडी पाटील : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत चिचोंडी पाटीलच्या (ता. नगर) माजी महिला सरपंच ...

Honorarium given by former woman sarpanch for construction of Vidyamandir | विद्यामंदिर उभारणीस माजी महिला सरपंचाने दिले मानधन

विद्यामंदिर उभारणीस माजी महिला सरपंचाने दिले मानधन

Next

चिचोंडी पाटील : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत चिचोंडी पाटीलच्या (ता. नगर) माजी महिला सरपंच अर्चना दीपक चौधरी यांनी गावच्या विद्यामंदिराच्या उभारणीस त्यांच्या कार्यकाळात मिळालेले संपूर्ण मानधन दिले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संकुलाच्या बांधकामासाठी त्यांनी २५ हजार रूपये शाळा प्रशासनाकडे जमा केले.

यावेळी शिक्षिका आर. आर. बुरा, एस. बी. धुमाळ, एम. जे. कदम, एम. बी. म्हस्के, एम. सी. शिंदे, ए. ए. शिंदे, जे. के. मोरे, एन. एस. पठारे, एस. एन. नांगरे, एन. एन. भोर, आर. एस. श्रीगादी, ए. एस. शिरसाठ, जयश्री शिंदे आदी उपस्थित होत्या.

---

०८ चिचोंडी

चिचोंडी पाटील येथे महिला दिन कार्यक्रमानिमित्त माजी सरपंच अर्चना चौधरी यांनी शाळेला पंचवीस हजाराची मदत दिली.

Web Title: Honorarium given by former woman sarpanch for construction of Vidyamandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.