गृह कर्ज स्वस्त; पण बांधकाम साहित्य महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:21 AM2021-07-28T04:21:28+5:302021-07-28T04:21:28+5:30

------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे सर्वच बँकांनी गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे; परंतु बांधकामाच्या साहित्याचे दर ...

Home loans cheaper; But construction materials became expensive | गृह कर्ज स्वस्त; पण बांधकाम साहित्य महागले

गृह कर्ज स्वस्त; पण बांधकाम साहित्य महागले

Next

-------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे सर्वच बँकांनी गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे; परंतु बांधकामाच्या साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कोरोनाने लॉक झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्रातील उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाने गृह खरेदीच्या खर्चात कपात केली असून, मुद्रांक शुल्क ८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. तसेच सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली. बँकांचे व्याज दर सर्वसमान्यांच्या अवाक्यात आले; परंतु बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, वाळू, सिमेंट, लोखंड आणि मजुरीच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. बांधकाम साहित्याचे दर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गृह कर्जाचे व्याजदर कमी झाले असले तरी घरांच्या किमती मात्र वाढलेल्या आहेत. त्यामुळे नगर शहरातील अनेक गृहप्रकल्प विक्रीविना पडून आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत; परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्प धूळखात पडून आहेत. बँकांनी गृह कर्जात कपात केल्याने कर्ज घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसतो; परंतु घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे.

.....

सन २०१८

विटा- ४ रुपये, प्रति नग

वाळू- ३५०० प्रति ब्रास

सिमेंट- २५० प्रति बॅग

लोखंड- ३२ रुपये, प्रति किलो

....

सन २०१९

विटा- ४

वाळू- ४५००

सिमेंट- २५०

लोखंड- ३८

....

२०२०

विटा- ६

वाळू - ४५००

सिमेंट- ३२५

लोखंड- ५८

.....

२०२१

विटा- ७

वाळू- ४५००

सिमेंट- ३५०

लाेखंड- ६०

...

बँकांचे व्याजदर असे

एसबीआय- ६.७०

बँक ऑफ इंडिया- ६.८५

एचडीएफसी- ६.७५

आयसीआयसी बँक- ६.९०

बँक ऑफ बडोदा- ६.८५

बँक ऑफ महाराष्ट्रा- ६.९०

---------

गृह कर्जावरील व्याजदरात बँकांनी कपात केली आहे; परंतु बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यामुळे घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.

- शेख, अध्यक्ष आर्किटेक्ट असोसिएशन

.....

बँकांनी व्याजदरात कपात केली आहे; परंतु घरांच्या किमती सर्वसमान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे घर विकत घेणे सध्या तरी शक्य नाही.

- नागरिक, अहमदनगर

......

Web Title: Home loans cheaper; But construction materials became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.