Hearty Farmer: Ten tonnes of Peru donated to the government | दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

अशोक निमोणकर /
जामखेड : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. 
शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांची माळरानावर सहा एकर शेती आहे. बरडाची शेती पडीक पडण्यापेक्षा या ठिकाणी विहीर खोदून अडीच वर्षांपूर्वी सरदार जातीचे पेरुची त्यांनी लागवड केली. हाडाचे शेतकरी असल्याने योग्य नियोजन व वेळोवेळी सेंद्रिय पध्दतीने खते व औषधे मारून पेरूबाग फुलवला आहे. या पेरूचे प्रत्येक फळ ३०० ग्रॅम वजनाचे असून फळांनी पेरूबाग बहरला आहे. 
      कोरोनामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्या संपूर्ण फळबागा मार्केट बंद आहे. संदीपान निंबाळकर या शेतकºयाचा पेरू पूर्ण काढण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने गाई-गुरांना पेरू खाऊ घालावा लागत आहे. अशा परस्थितीमध्ये पेरूचे पैसे तर होणारच नाहीत. तो सोन्यासारखा माल नासून जाण्यापेक्षा माणसांच्या मुखात जावा अशी भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली. अडीच वर्षे फुलवलेल्या या फळबागेसाठी आतापर्यंत चार लाखाच्या आसपास खर्च केला. हा खर्च सहन करून त्यांनी संपूर्ण पेरूची १० टनाची बाग सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना कोरोनासारख्या संकटाप्रसंगी सरकारला दान करण्याचा संकल्प त्यांनी केला.
      निंबाळकर यांनी शिवूरचे उपसरपंच सिध्देश्वर लटके यांच्याशी चर्चा केली. तत्काळ   तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याबरोबर संपर्क साधला. ते तत्काळ शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या शेतात जाऊन पेरू बागेची पाहणी केली. यावेळी कामगार तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, बदाम निंबाळकर, नाना सावंत, महादेव झरकर, वसंत निंबाळकर, एकनाथ चव्हाण उपस्थित होते. 
 

 जामखेड तालुक्यातील गोरगरिब जनतेला, विविध भागातील विधवा, मजूर, दिव्यांग, वयोवृद्ध, गरिब व्यक्तींना हा पेरू कसा पोहोच करता येईल? याचे नियोजन करण्यात येईल. शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे दु:ख तर आहेच. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक आहे.  -विशाल नाईकवाडे, तहसिलदार, जामखेड.
 

Web Title: Hearty Farmer: Ten tonnes of Peru donated to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.