अनुसूचित जाती वस्तीत मिळणार व्यायामशाळा साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:42+5:302021-02-25T04:26:42+5:30

अहमदनगर : अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात विशेष बाब म्हणून खुली व्यायामशाळा साहित्य देण्यात ...

Gym equipment will be available in Scheduled Caste settlements | अनुसूचित जाती वस्तीत मिळणार व्यायामशाळा साहित्य

अनुसूचित जाती वस्तीत मिळणार व्यायामशाळा साहित्य

googlenewsNext

अहमदनगर : अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात विशेष बाब म्हणून खुली व्यायामशाळा साहित्य देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यातील घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जातात. यात पाणी पुरवठ्याची कामे, मलनिस्सारण, वीज, गटर बांधणे, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर बांधकामांचा समावेश आहे. मात्र यात खुली व्यायामशाळा साहित्याचा समावेश नव्हता. त्यामुळे समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मुंडे यांनी नगर जिल्ह्याकरिता विशेष बाब म्हणून खुल्या व्यायामशाळेत साहित्य देण्यास निधी देण्याचे मान्य केले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत याचा फायदा होणार आहे. योजनेचे प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहेत, असे परहर यांनी सांगितले. या योजनेसाठी जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांनी विशेष प्रयत्न केले.

------

फोटो - २४उमेश परहर

Web Title: Gym equipment will be available in Scheduled Caste settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.