शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाहुणे म्हणून येऊन करायचे चोरी : दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 6:37 PM

लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़

अहमदनगर: लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही टोळी दरोड्याच्या तयारीत असताना एलसीबी पथकाने सोमवारी मध्यरात्री शिर्डी येथील निघोज फाटा परिसरात सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले़दिलीप मानसिंग सिसोदिया (वय ३०), नवीन प्रेमनारायण भानेरिया(वय ३२), मोहनसिंग गोपालसिंग सिसोदिया(वय २२), प्रदिप मानसिंग सिसोदिया (वय २०), अशिषकुमार अनूपसिंग छायन (वय २०) व अभिषेक विनोद सिसोदिया (वय २०) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत़ या टोळीकडून दोन कार, एक तलवार, एक सत्तूर, चार लाकडी दांडे, मोबाईल, ६ तोळे सोने असा १० लाख १ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ या टोळीने ३० डिसेंबर रोजी शिर्डी येथे लग्नसमारंभातून ५५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते़ याचे सीसीटिव्ही फुटेज पोलीसांना मिळाले होते़ तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी या टोळीने चोरी केल्याचा पोलीसांचा संशय आहे़जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरिक्षक सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेक, पोलीस हेड कॉस्टेबल मनोज गोसावी, सुनील चव्हाण, पोलीस नाईक शंकर चौधरी, अण्णा पवार, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश गोसावी, रविंद्र कर्डिले आदींच्या पथकाने ही कारवाई केली़पचौरमध्ये दरोडेखोरांचे ट्रेनिंग सेंटरमध्यप्रदेश राज्यातील पचौर (जि़ राजगड) या तालुक्यातील कडिया, सासी, गुलखेडी, पिपलिया या गावांमध्ये प्रत्येक घरातील मुलांना चोरीचे प्रशिक्षण दिले जाते़ या ठिकाणी स्थायिक असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या एखाद्या कंपनीसारखे प्रशिक्षित चोर तयार करून त्यांना चोरीसाठी मार्केटमध्ये पाठविले जाते़ प्रशिक्षित मुलांना टोळीप्रमुख एक वर्षासाठी करारतत्वावर घेतो़ यासाठी तो त्या कुटुंबाला वर्षाला ४ ते १० लाख रूपये देतो़ पुढे त्या मुलाची किमत त्याच्या चोरी करण्याच्या क्षमतेवरून ठरविली जाते़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस