शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

निधी वाटपावरून नगरचे पालकमंत्री- जि. प. पदाधिका-यांत पुन्हा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:07 PM

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वाटपावरून झालेला वाद ताजा असतानाच नावीन्यपूर्ण योजनेच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. 

अहमदनगर: जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वाटपावरून झालेला वाद ताजा असतानाच नावीन्यपूर्ण योजनेच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. नियोजनच्या शिफारशींनुसार कामे वाटप करण्यास अध्यक्षा शालिनी विखे यांचा विरोध असून, शिफारशी केल्याप्रमाणे भाजपाच्या सदस्यांना कामे देण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. या वादात जिल्हा परिषदेच्या जनसुविधेची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी विविध यंत्रणांना वितरीत केला जातो. संबंधित यंत्रणा कामाचे प्रस्ताव तयार करून ते अंतिम मंजुरीसाठी नियोजनकडे पाठवितात. जिल्हा वार्षिक योजनेत नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषदेला जनसुविधेसाठी १२ कोटी मंजूर आहेत. या निधीतून जिल्हा परिषदेने कामे सुचविली. या कामांच्या प्रशासकीय मान्यतेची प्रक्रियाही जिल्हा परिषदेत सुरू आहे. असे असले तरी नियोजन समितीने याच निधीतून काही कामे सुचविली आहेत. तसे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे. नियोजनच्या या पत्रामुळे जिल्हा परिषदेचाही गोंधळ उडाला आहे. नियोजनची शिफारस असलेली कामे घेतल्यास अन्य सदस्यांचे काय असाही प्रश्न आहे. त्यामुळे पदाधिकारीही चांगलेच संतापले आहेत़ जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे आहेत. त्यांनी नियोजनमार्फत पत्र पाठवून कामांची शिफारस केल्याची चर्चा आहे. ही सर्व कामे भाजप सदस्यांच्या गटातील आहेत. मात्र जिल्हा परिषदेने तयार केलेल्या प्रस्तावांनाच फक्त प्रशासकीय मान्यता देण्याची जिल्हा परिषदेची भूमिका आहे. निधी खर्चाचे अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. कुणाच्या शिफारशीनुसार कामांचे वाटप होणार नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे़ पालकमंत्र्यांनी दिलेल्या विशेष निधीवर भाजपाच्या सदस्यांनी दावा केला आहे. भाजपाच्या सदस्यांना कामे न मिळाल्यास जिल्हा परिषदेकडून प्रस्तावित केल्या जाणा-या कामांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कारण अंतिम मंजुरीचे अधिकार जिल्हा नियोजन समितीला आहेत. या समितीचे अध्यक्ष स्वत: पालकमंत्री असल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत धुसफूस

जिल्हा परिषदेत शिवसेनेने आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. मात्र सेनेच्या सदस्यांना या कामांतून डावलण्यात आलेले आहे. त्यात नियोजन समितीने शिफारस केल्याने सेनेकडून पालकमंत्र्यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता असून, सेना- भाजपातही वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeप्रा. राम शिंदे