Gopalwadi school's 'planetarium' | गोपाळवाडी शाळेत अवतरली ‘ग्रहमाला’
गोपाळवाडी शाळेत अवतरली ‘ग्रहमाला’

अहमदनगर : सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, शनी आणि मंगळाला घेऊन पूर्ण ग्रहमालाच शनिवारी (दि़ १३) गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अवतरली! शनीची उडती तबकडी, लालेलाल मंगळ, सूर्य आणि भलामोठा गुरु, पृथ्वी हे चक्क आपल्यासमोरच अवतरल्याचे पाहून मुलेही चकित झाली़ उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी हे करुन दाखवले आहे ‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ या अप्लिकेशनच्या माध्यमातूऩ
दफ्तरमुक्त शनिवार आणि आनंददायी शिक्षणाच्या संकल्पनेतून उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध नवनवीन प्रयोगाच्या सहायाने, तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम करीत आहेत़ याचा भाग म्हणून शनिवारी त्यांनी निरस वाटणारा भूगोल हा विषय तंत्रज्ञानाच्या वापरातून सोपा करुन विद्यार्थ्यांना शिकविला़ प्रत्यक्ष ग्रहमाला वर्गात आणून विद्यार्थ्यांना प्रत्येक ग्रह समजावून सांगितला़ मोबाईलवरील तंत्रज्ञानाचा अविष्कार पाहून मुलेही हरखून गेली़

विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढली
‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खगोलीय सूर्यमाला प्रत्यक्ष वर्गात अवतरण्याची किमया शनिवारी गोपाळवाडी शाळेत घडली़ लालेलाल मंगळ ग्रह, कडी असलेला शनी, सर्वात मोठा गुरू आणि आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी व पृथ्वीचा त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे सगळं पाहून विद्यार्थी चकित झाले.

अशी अवतरते सूर्यमाला
संपूर्ण ग्रहमाला पाहण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोरवरच्या ए७स्र’ङ्म१ी१- ाङ्म१ टी१ॅी उ४ुी हे अ‍ॅप आणि त्याची मार्कर इमेज असणारे टी१ॅी उ४ुी डाऊनलोड करून घ्यावे लागेल़ त्यानंतर त्या क्युबवर स्कॅन करुन अ‍ॅप उघडल्यास आपल्यासमोर सूर्यमाला अवतीर्ण झालेली पाहायला मिळेल़

नवीन तंत्रज्ञानाने दृश्य स्वरुपात विद्यार्थ्यांना पाठ शिकविल्यास ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहते़-सर्जेराव राऊत, मुख्याध्यापक


तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविल्यास विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा आनंद लुटता येतो़ विविध संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते़ -नारायण मंगलारम, शिक्षक

Web Title: Gopalwadi school's 'planetarium'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.