शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

साई संस्थानामध्ये तूप घोटाळा?; कुलकर्णी यांचा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:46 PM

या प्रकरणाची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीत पुरवठादाराने काही विश्वस्त व अधिका-यांवर लाच दिल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे.हरियानातील एका तुपाच्या पुरवठादाराने टेंडर पोटी आपण काही विश्वस्त व अधिका-यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचे ८ डिसेंबर रोजी व्यवस्थापनाच्या बैठकीत सांगितले़ त्यासंबधी पुरावे असल्याचेही त्याने पत्राद्वारे कळवल्याचेही समजते़ याशिवाय खासदार सदाशिव लोखंडे यांनीही पत्रकार परिषद घेवून तूप खरेदीत विश्वस्त व अधिकाºयांना लाखो रूपये दिल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. मात्र या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. हे प्रकरण आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, लाचखोरीचे असून त्यामध्ये विश्वस्त व वरिष्ठ अधिकारी सामिल असल्याचे आरोप होत असल्याने सदर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठवावा व दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. अन्यथा सर्व विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी व संबंधित पुरवठादार यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. संस्थानचा बुंदी लाडुचा प्रसाद भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. तो दर्जेदार असावा यासाठी कुलकर्णी यांनी यापूर्वी उच्च न्यायालयातही दाद मागितलेली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर