शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रूग्णांना नवा चेहरा देणारा जर्मन अवलिया; सर्वसामान्यांच्या चेह-यावर हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:05 PM

जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. आंद्रे बोस्से त्यांच्या सात सहका-यांसह शेवगावच्या नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करीत आहेत. या कामासाठी त्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे.

अनिल साठे । शेवगाव : जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. आंद्रे बोस्से त्यांच्या सात सहका-यांसह शेवगावच्या नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करीत आहेत. या कामासाठी त्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या या सेवेमुळे अनेक गरजू रुग्णांना नवा चेहरा मिळाला आहे.शेवगाव शहरातील नित्यसेवा हॉस्पिटल येथे सोमवारपासून (दि.३ फेब्रुवारी)मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन केले आहे. २०१३ सालापासून दरवर्षी हे शिबिर भरवण्यात येते. डॉ. आंद्रे बोस्से यांच्यासह त्यांचे सहकारी इवा, मायनीन, गाबी, मारिया, पेत्रा, अण्णा लीना यांनी दीडशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी शंभरहून अधिक रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते. त्यांनी त्यांच्यावर तसे उपचारही सुरू केले.  दुभंगलेले ओठ, पापण्यांची विकृती, चेहºयावरील व्रण व डाग, तसेच नाक, कानावरील बाह्य विकृतीवर मोफत, जळलेला भाग, चिकटलेली मान अशा व्याधींवर सर्जरी केली जाते. या शिबिरादरम्यान मोफत जेवणाची सोय करून उपचार केलेल्या रूग्णांची विशेष देखभाल ठेवली जाते. ८०० हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.शरिरावरील अशा व्याधीमुळे अनेक मुलींचे लग्न जमत नव्हते. मात्र सर्जरी केल्यावर त्या मुलींचे लग्न जमले, असे  सिस्टर हिल्डा यांनी सांगितले. डॉ. आंद्रे हे सहा वर्षांपासून सेवाभाव या वृत्तीने इथे येतात. भारतीयांविषयी त्यांच्या मनातील आदर ठळकपणे जाणवतो. सर्वांशी हसून तोडके, मोडके मराठी शब्द बोलत आपलेपणाने चौकशी करतात. त्यांची टीमही त्यांना या कार्यात मोलाची साथ देत आहे.ज्या वेळी मी आॅपरेशन थिएटरमध्ये रुग्णांवर उपचार करीत असतो, त्यावेळी मी डोक्याने नाही तर हृदयापासून काम करतो. आॅपरेशन करताना मला अभ्यास नाही तर रुग्णांच्या चेहºयावरील प्रेमळभाव यश मिळवून देतो. इथल्या लोकांची प्रेमळ भावना मला ऊर्जा देते, असे त्यांनी  ‘लोकमत’ला सांगितले.येथील समाधान अन्यत्र मिळत नाही.

मी अनेक देश फिरलो, पण येथे आल्यावर जे समाधान   लाभते ते अन्यत्र कुठेच मिळत नसल्याचे डॉ. आंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य